‘जमात ए-इस्लामी हिंद’चा स्तुत्य उपक्रम ! अंधारातून प्रकाशाकडे राज्यभरात या अभियानाचे आयोजन

पोलिसनामा ऑनलाईन – जमात ए इस्लामी हिंद (Jamaat-e-Islami Hind) तर्फे महाराष्ट्रात 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान राज्यभरात 12 कोटी बंधू-भगिनी साठी छोट्या वस्तीपासून मोठ्या शहरापर्यंत अंधारातून प्रकाशाकडे हे राज्यव्यापी अभियान राबविण्यात येत आहे .

कोरोनाच्या संकट छायेत शारीरिक अंतर पाळताना समाजाला साथीच्या आजारापासून मुक्त करताना समाजातील विविध क्षेत्रात असलेले अज्ञान समस्या यावर मात करणे आणि उज्वल वर्तमान व भविष्य साठी अखंड प्रकाश कसा तेजोमय करता येईल यावर भर देण्यात येणार आहे. देशात मुस्लिम समाजाबद्दल केला जाणारा अपप्रचार यामुळे मुस्लिम समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

देशातील लोकांना इस्लामचा परिचय न दिल्याने या समस्या उद्भवल्या आहेत इस्लाम आणि मुस्लिमांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान राबविले जात आहे. जमात-ए-इस्लामी हिंद द्वारे वैयक्तिक भेटी, बॅनर फलकावर प्रेषितांचे संदेश इत्यादी माध्यमातून प्रबोधन करण्यात येत. दिनांक 24 जानेवारी रविवार रोजी सकाळी साडे अकरा ते दोन च्या दरम्यान पाथरी येथे येथील हजरत बिलाल मशिदीत अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान आयोजित केले होते यावेळी उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून साप्ताहिक शोधाचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान यांची उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल कदीर यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान यांनी चांगल्या वाईट विचाराचे वर्गीकरण आदर्श जीवन पद्धत मरणोत्तर जीवन समाजात निर्माण झालेल्या विविध समस्या व त्यांच्या निराकरणासाठी उपयुक्त विचार इस्लाम व मुस्लिमांना बद्दलनिर्माण केलेला दृष्टिकोन व वस्तुस्थिती यावर त्यांनी आपले विचार मांडलेत यावेळी मोठ्या संख्येने हजरत बिलाल मशीद येथे शहरातील विविध समाजबांधवांची उपस्थिती होती.