‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या ‘त्या’ ड्रेसवर ‘भन्नाट’ मीम्स ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संगीत क्षेत्रातील मानाचा असणाऱ्या ग्रॅमी अवॉर्डला बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आणि पती गायक व संगीतकार निक जोनास यांनी हजेली लावली होती. यावेळी या सोहळ्यातील प्रियंकानं घातलेल्या ड्रेसची सोशलवर बरीच चर्चा झाली. अनेकांनी तिच्या ड्रेसचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोलही केलं. अजूनही प्रियंकाच्या या फोटोंची सोशलवर चर्चा सुरूच आहे.

प्रियंकाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पांढरा शुभ्र लाँग ड्रेस घातला होता. मर्मेड लुक देणाऱ्या लुकमध्ये प्रियंकाचं जवळपास अर्ध क्लीव्हेज स्पष्ट दिसत होतं. क्लीव्हेज जास्त प्रमाणात असल्यानं अनेकांनी तिच्या या अंगप्रदर्शनाबद्दल तिला ट्रोल केलं आहे. हा गाऊन डिप फ्रंट ओपन गाऊन असल्यानं गळ्यापासून बेंबी पर्यंतचा सर्वच भाग दिसत होता. आपल्या अति शो ऑफमुळे प्रियंका ट्रेलर्सच्या निशाण्यावर आली.

प्रियंकाच्या काही चाहत्यांनाही तिची ही स्टाईल आवडली असली तरी काहींना मात्र हे खटकलं आहे. अनेकांनी निगेटीव कमेंट करत तिल ट्रोल केलं आहे. काहींनी म्हटलं आहे की, तू हे चांगलं नाही केलं. काहींनी म्हटलं आहे की, ही स्टाईल आवडली नाही. एकानं तर तिला असं म्हटलं आहे की, आता काय दाखवायचं राहिलं आहे.

https://www.instagram.com/p/B77kX-LJtsg/?utm_source=ig_embed

नेटकऱ्यांकडून अजूनही प्रियंकाची खिल्ली उडवणं सुरूच ठेवलं आहे. आता तर अनेक नवनवीन मीम्स सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान प्रियंकानं नुकतंच ट्रोलर्सना उत्तरही दिलं होतं.

प्रियंका आणि निकनं रेड कार्पेटसाठी खास तयारी केली होती. प्रियंकानं घातलेला हा ड्रेस राल्फ अँड रसो या डिझायनरचा आहे. प्लंजिंग नेकलाईनमुळे हा ड्रेस चर्चेत आला. नाजूक एब्रॉयडरी असणाऱ्या या ड्रेसवर हिरेही जडवले होते. प्रियंका आणि निकचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B77wC7kHm6N/?utm_source=ig_embed