सरकार ‘सोन्या’ संबंधित नवी ‘योजना’ आणण्याच्या तयारीत, होणार तुम्हाला ‘फायदा’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की ते खास प्रोगाम आणण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सांगितले की जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी इंडस्ट्रीला सांगू इच्छितो की सरकारच्या सहाय्याने अशी स्कीम आणण्यास मदत करा ज्यामुळे लोक आपल्या घरात जे सोनं आहे ते आपल्या मर्जीने जमा करतील. फिक्स डिपॉजिटच्या पद्धतीनं त्यावर व्याज मिळवेल आणि जेव्हा हवं तेव्हा आपलं सोनं घरी घेऊन येऊ शकतील.

का येत आहे सोन्यासंबंधित नवी योजना
पीयूष गोयल म्हणाले की अशी योजना आणण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश्य मोठ्या प्रमाणात न वापरता पडून राहिलेल्या सोन्याचा चांगला उपयोग करून घेणे हा आहे. तसेच सरकार ज्वेलरी पार्क बनवण्याच्या विचारात आहे आणि मला वाटते की इंडस्ट्रीने यासाठी पुढे यावे.

सरकारने या महिन्याची सुरुवात सोन्याच्या दागिण्यांशी संबंधित एक नियमात बदल केला आहे. भारतात आता सोन्याच्या दागिण्यांवर BIS हॉल मार्किंग अनिवार्य (BIS Hallmarking for Gold Jewellery) असेल. यासाठी सरकार 15 जानेवारी 2020 मध्ये अधिसूचना जारी करेल.

अधिसूचना जारी झाल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर 15 जानेवारी 2021 मध्ये सोन्याच्या दागिण्यांवर BIS हॉल मार्किंग अनिवार्य असेल. ते म्हणाले की, हे मार्किंग अनिवार्य झाल्यानंतर सराफांनी नियमांकडे दूर्लक्ष केल्यास एक लाख रुपयांचा दंड आणि एक वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दंड म्हणून सोन्याच्या किंमतीच्या 5 टक्क्यांपर्यंत रक्कम आकारण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/