पिंपरी चिंचवड मनापा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्तांची मान्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी – चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास तातडीने ७ वा वेतन आयोग लागू करणेबाबतची मागणीस आयुक्तांची मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मनपा अधिकारी व कर्मचा-र्यांना ७ वा वेतन आयोग लागू करणेबाबतचा मान्यता देत असल्याचा आदेश दि. २०.१२.२०१९ रोजी दिला होता. राज्य शासनाने मनपा अधिकारी व कर्मचारीवर्गास ७ वा वेतन आयोग लागू करण्यास काही अटींवर मान्यता दिलेली होती. शासनाने ज्या अटींवर पिंपरी चिंचवड मनपास ७ वा वेतन आयोग लागू करण्यास परावानगी दिली त्याच अटीवर नवी मुंबई मनपास ही ७वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिलेली आहे.

नवी मुंबई मनपाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग लागू केला असून पिंपरी –चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास मात्र ७ वा वेतन आयोग लागू झाला नसल्याने आमदार बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे १० मे रोजी मागणी केली होती.

आमदारांनी केलेल्या मागानीनुसार आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही सुरु केली आणि आज वेतन आयोगाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू लागू केल्याबद्दल आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. मनपा कर्मचाऱ्यांचे बनसोडे यांनी अभिनंदन केले असून जबाबदारी वाढली असल्याने शहरातील नागरिकांना उच्च व चागल्या सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार बनसोडे यांनी मनपा कर्मचारीवर्गास केलेले आहे