गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकांची आयुक्तांकडून विचारपुस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील चंदननगर परिसरातील एका गृहरचनेत महिलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेतील युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार पुणे रेल्वे स्थानक येथे गेले होते.

त्यावेळी आरोपींनी पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गजानन पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचार पुस केली.

२१ नोव्हेंबर रोजी गोळीबार करुन खून करण्यात आलेल्या आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक गजानन पवार हे करीत होते. त्यावेळी त्यांना आरोपी पुणे रेल्वे स्थानक येथे असल्याची माहिती मिळाली. गजानन पवार आणि त्यांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आरोपींनी गजानन पवार यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने पवार यांना जवळच्या रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी अवस्थेत असताना देखील जिगरबाज पवार यांनी आरोपींना अटक केली.

रुग्णालायात उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करुन त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांनी पवार यांना भेट स्वरुपात एक पुस्तक देखील दिले. तसेच पवार यांनी प्रकृतीची काळजी घेऊन लवकरात लवकर बरे व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली.