तुकाराम मुंढेंकडून काढून घेण्यात आला ‘या’ पदाचा पदभार

नागपूर : पोलीसामा ऑनलाइन –  नागपूर महानगरपालिकेतील आयुक्त विरुद्ध महापौर असा आखाड रंगला आहे. त्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेले नागपूर स्मार्ट सीटी सीईओ पदाचा चार्ज काढून घेण्यात आला आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यापुढे स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रहाणार नसून त्यांच्याजागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय नागपूर येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सीईओ (पूर्ण वेळ) नेमण्यासाठी जाहिरात काढणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
महापौरांनी दाखल केला अर्ज

महापौर संदीप जोशी यांचा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध अर्ज दाखल केला आहे. या अर्जात स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांच्यासह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असा आरोप जोशी यांनी केला असून त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like