वस्तू उत्पादनात तेजी, वृद्धीदर 13 वर्षांच्या उच्चांकावर

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संकटातून बाहेर पडत असलेल्या भारतीय वस्तू उप्तादन क्षेत्रातील वृद्धीदर वाढून १३ वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. आयएचएस मार्किट इंडियाने जारी केलेल्या पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) ऑक्टोबरमध्ये ५८. अंकावर पोहोचला. गट महिन्यात तो ५६.८ अंकावर होता. ५० अंकांच्या वरील पीएमआय तेजी, त्याखालील पीएमआय मंदी दर्शवते .

पीएमआयमधील वृद्धीमुळे चालू वित्त वर्षाच्या तिमाहीतील एकूणच आर्थिक वृद्धीबाबत चांगले संकेत मिळत आहेत. पीएमआय अहवालानुसार २००७ नंतरची सर्वोत्तम उत्पादन वृद्धी ठरली आहे. तसेचविक्रीमध्ये २००८ नंतरचा उच्चांक आहे.

आयएसएस मार्किटच्या आर्थिकसहयोगी संचालिका पॉलियाना दे लिमा यांनी सांगितले, की कच्च्या मालाच्या खरेदीत उच्चांकी वाढ झाल्याने विक्रीतील वृद्धी कायम राहील असा विश्वास कंपनीनमध्ये दिसून येत आहे.