कामाची गोष्ट ! कोणत्याही अडचणीत कामाला येतात ‘हे’ 5 कायदेशीर अधिकार, सर्वसामान्यांना माहिती असणं गरजेचच, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या वाहतूक नियमांमुळे आणि त्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडामुळे लोक त्रस्त झाले आहेत. अनेकांना मोठ मोठे दंड भरावे लागले. या दरम्यान तुम्हाला वाहतूकीचे काही नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आज जग अत्यंत व्यस्त झाले आहे. अनेकदा आपण काही कायदेशीर पेचात सापडतो. त्यावेळी तुम्हाला स्वत: निर्दोषता सिद्ध करण्यासाठी एखाद्या कायद्याची माहिती असलेल्या वकीलाची मदत घ्यावी लागते. परंतू तुम्हाला काही सर्वसामान्य अधिकारांची माहिती हवी. जे साधारण आहेत परंतू महत्वपूर्ण आहेत. हे माहिती असल्यास तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी स्वत: सोडवू शकतात.

1) Live-in relationship
आपला समाज लिव इन रिलेशनशिपला अशा नजरेने पाहतो की तो एखादा गुन्हा असावा. असे असेल तरी कायदेशीर पद्धतीने हा कोणताही गुन्हा नाही. यात आणखी महत्वपूर्ण बाब म्हणजे या नात्यातून एखादे मुल जन्माला आल्यास आई वडीलांच्या संपत्तीवर त्याचा पूर्ण अधिकार असेल.

2) गॅस सिलेंडर दुर्घटना
जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडरला अचानक आग लागली किंवा स्फोट झाला तर तुम्ही जवळपास 40 लाख पेक्षा जास्त भरपाईची मागणी करु शकतात.

3) महिलांना ताब्यात घेण्याचा अधिकार
महिलांना अटक करण्यासाठी विविध नियम आहेत. ज्यात एक महिला आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यासाठी दुसरी महिला पोलीस कर्मचारी हवी. महिला पोलीस कर्मचाऱ्याशिवाय एखाद्या महिलेला पोलीस अटक करु शकत नाहीत. जर असे केल्यास तो गुन्हा ठरतो. तसेच एखाद्या महिला आरोपीला पोलीस संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत अटक करु शकत नाहीत. असे जर एखाद्या महिलेबाबत घडत असेल तर ती अटक होण्यास नकार देऊ शकते.

4) तलाक / घटस्फोट घेण्याचा अधिकार –
पती पत्नीत शारिरिक संबंधाबाबत काही अडचणी असतील तर या गोष्टीमुळे त्यांना अधिकार आहे की ते वेगळे होऊ शकतात. न्यायालयात जाऊन घटस्फोट घेऊ शकतात.

5) प्रवासासंबंधित नियमांमधील काही विशेष अधिकार
सध्या देशात वाहतूक नियमांमुळे लोक वैतागले आहेत. दंडाची रक्कम वाढवल्याने लोक सावध झाले आहेत. अनेकांना जास्त रक्कमेचे दंड भरावे लागले. वाहतूकीच्या नियमांनुसार वाहतूकीचा तुम्ही एखादा नियम मोडल्यास दिवसाला तुम्हाला एकदाच दंड ठोठावला जाऊ शकतो. त्याच दिवशी तुम्हाला दुसरा दंड ठोठावण्यात येऊ शकत नाही.

Visit : Policenama.com