तुमच्या ‘या’ सवयींमुळं वेळेआधीच पांढरे होतात केस ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आजकाल कमी वयातच केस पांढरे होताना दिसत आहेत. अनेक उत्पादनं वापरूनही केसांची ही समस्या दूर होत नाही. याला कारणीभूत तुमच्या सवयीदेखील असतात. या सवयी कोणत्या आहेत याची माहिती घेऊयात.

1) जास्त चहा-कॉफी पिणं – जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्यानं केसांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यामुळंच वेळेआधीच केस पांढरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं कॅफीन असलेले पदार्थ टाळून तुम्ही चहा किंवा कॉफी ऐवजी अँटी ऑक्सिडेंट असलेल्या ग्रीन टीचं सेवन करू शकता.

2) हिरव्या भाज्या न खाणं – हेल्दी डाएट तुमच्या शरीरासोबतच तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं ठेवतो. म्हणून तुम्हालाही जर मजबूत आणि चांगले केस हवे असतील तर डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस आणि फॉलिक अ‍ॅसिड असणाऱ्या फळांचं आणि भाज्यांचं सेवन करा.

3) योग्य रंगांचा वापर न करणं – जर केस कलर करण्याची इच्छा असेल तर ऑईल बेस्ड हेअर डायचा वापर करावा. तेल असलेल्या डायमुळं केस अधिक चमकदार होतात. यामुळं केसांचं पाढंरं होण्याचं प्रमाणंही कमी होतं. आठवड्यातून एकदा कलर प्रोटेक्टींग शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like