Common Service Centres (CSC) | डॉक्टरांचा सल्ला आता WhatsApp वर; सरकारने आणली ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Common Service Centres (CSC) | आता डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी (Stand in long lines at the hospital to consult a doctor) तुम्हाला हॉस्पिटलच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. कारण आता डॉक्टर तुमच्या (Dr. Saheb will be available on your WhatsApp) व्हॉट्सअपवर उपलब्ध होतील. Common Service Centres (CSC)

 

होय, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Center) योजनेद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणार्‍या लोकांसाठी टेलीकन्सल्टेशन सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने व्हॉट्असपवर एक डेडिकेटेड हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा केली आहे, तिला ’CSC Health Services Helpdesk’ म्हटले जात आहे.

 

हेल्पडेस्कवर लोकांना मिळतील या सुविधा

व्हॉट्सअप हेल्पडेस्क (WhatsApp Helpdesk) लोकांसाठी प्रशासनाकडून मदत घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे,
कोविडसंबंधीत संसाधनाच्या विस्तृत श्रृंखलेपर्यंत पोहचवणे आणि प्रश्नांवर मार्ग काढणे सोपे बनवते. Common Service Centres (CSC)

 

व्हॉट्सअपवरील सेवेचा असा करावा वापर

सेवा सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे, म्हणजे वापरकर्ते व्हॉट्सअप (CSC Health Services Helpdesk on WhatsApp for free) वर मोफत सीएससी हेल्थ सर्व्हिसेस हेल्पडेस्कचा वापर करू शकतील. ही सेवा हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध असेल.

हेल्पडेस्कपर्यंत पोहचण्यासाठी व्हॉट्सअप वापरकर्त्यांना +917290055552 नंबरवर एक ’Hi’ मेसेज पाठवणे आणि डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी पर्यायांची निवड करावी लागेल.

सीएससीनुसार, हेल्पडेस्क सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल प्रकारे समाविष्ठ चॅनलच्या
माध्यमातून आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या आपल्या लक्ष्याचा एक महत्वाचा आणि सहज सुलभ विस्तार म्हणून विकसित केले आहे.

 

त्यांनी पुढे म्हटले की, हे चॅटबोट विशिष्ट प्रकारे एक कस्टमाईज्ड सोल्यूशन म्हणून बनवले आहे,
जे भारतात लोकांना सामान्य सेवा प्रदान करण्यासाठी लाभदायक होईल.
आम्ही हे चॅटबोट भारतातील लोकांना वापरण्यासाठी सोपे आणि विनाअडथळा बनवण्यासाठी व्हॉट्सअपने केलेल्या सहकार्यासाठी आभारी आहोत.

 

Web Title :- Common Service Centres (CSC) | there is no need for a long line to consult a doctor now the doctor will be available on whatsapp the government has brought this special facility

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Facial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass, मार्च 2022 पासून पुण्याच्या लोहगाव विमानतळासह 4 ठिकाणी सुरू होईल FRT System

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

Gold Price Today | सोन्याचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव