मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Community Health Officer | राज्यभरातील विविध शासकीय रूग्णालयातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या (दि.१) फेब्रुवारीला राज्यतील समुदाय आरोग्य अधिकारी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील सुमारे दहा हजार समुदाय अधिकारी (Community Health Officer) या आंदोलनामध्ये भाग घेणार असून त्यामुळे ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रूग्णांना खासगी रूग्णालयात जावे लागणार आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वीदेखील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी शासनाला निवेदन दिले आहे. तसेच याअगोदर देखील अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. मात्र तरीही राज्य सरकार मागण्या पूर्ण करत नसल्याने पुन्हा एकदा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. उद्या मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय कामबंद आंदोलन समुदाय आरोग्य अधिकारी करणार आहेत. त्यानंतर प्रशासन याबाबत काय निर्णय घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहेत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (Community Health Officer) मागण्या :
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट “ब” दर्जा देण्यात यावा
– सन २०१७ पासून आमच्या हक्काचे ५% वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावे.
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवेत कायम करून गट “ब” दर्जा देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत, निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन रू.२५०००/- (६२.५%) वरून रू.३६०००/- (९०%) व कामावर आधारित वेतन रू.१५००० (३७.५%) वरून रु.४००० (१०%) एवढे करावे
– समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात धोरण निश्चित करण्यात यावे.
– सध्याचे २३ इंडिकेटरचे कामावर आधारित मोबदला चे फॉरमॅट रद्द करून केंद्राने सुचविल्याप्रमाणे १५ इंडिकेटर
अमलात आणावे आणि तोपर्यंत प्रति इंडिकेटर एक हजार रुपये देण्यात यावे
– केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पदोन्नती बढती मिळावे.
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना TA-DA मिळावे
– समुदाय आरोग्य अधिकारी यांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे
– हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या यादीत शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात यावे
आणि तो कामावर आधारित नाही तर सरसकट द्यावा.
– एस फॉर्म भरण्याची तांत्रिक जबाबदारी हे समूदाय आरोग्य अधिकारी यांचे नसून सुद्धा आमच्यावर सक्ती करत आहे.
त्यामुळे मा. संचालक- ०२ यांनी काढलेले पत्र त्वरित रद्द करावे.
Web Title :- Community Health Officer | community health officers in the state will strike tomorrow
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update