पुण्यात २१ बटूंचा सामूहीक व्रतबंध सोहळा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील ब्रम्हवृंद मित्र परिवाराकडून सामूहीक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात २१ बटुंचे सामूहिक उपनयन संस्कार पार पडले. दरम्यान, यानिमित्ताने सकाळी बटूंची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली होती. शुक्रवारी (दि.४) झालेल्या या सोहळ्यास आमदार मेघा कुलकर्णी यांनी हजेरी लावून बटूंना आशीर्वाद दिले.

कोणताही थाटमाट न करता साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. सर्व बटूंची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समाजातील अनेक मान्यवरांनी भरघोस आर्थिक मदत दिल्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. तसेच बटुंनी उपनयन संस्कारानंतर दररोज संध्या करावी, असे आवाहन मान्यवरांनी येथे केले.