मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांचं देखील लसीकरण करू शकतात कंपन्या, अखेर ‘तो’ निर्णय मागे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत देशात 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून आता 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्याचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरणाचा निर्णय घेतला होता. परंतु यानंतर यात काही बदल करत कंपन्यांना केवळ आपल्या कर्मचाऱ्यांचेच लसीकरण करता येईल, त्यांच्या कुटुंबीयांचे कंपन्या लसीकरण करू शकणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत असल्याने सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करता येणार आहे. यात कर्मचारी, त्यांची पती, पत्नी, त्यांची मुले, आई-वडील, सासू-सासरे यांचा समावेश केला आहे. परंतु कुटुंबीयांपैकी कोणाला लस द्यायची हे कंपनीच्या अंतर्गत धोरणांवरही अवलंबून आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मर्यादा केवळ कर्मचाऱ्यांनाच लागू होणार नाही, अशी अ‍ॅडव्हायझरी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शुक्रवारी (दि. 21) राज्यांना देण्यात आली. त्यानंतर शनिवारी (दि. 22) ही नवी अ‍ॅडव्हायझरी सर्व कंपन्यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच्या निर्णयामुळे लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावेल अशी शक्यता वर्तवली होती. शुक्रवारच्या पत्रात असे नमूद केले आहे की, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याच्या प्रक्रियेस गती मिळणार आहे.

परिणाम होण्याची व्यक्त केली होती भीती

जर हे लागू केले असते तर लोकांना अन्य सेंटर्समध्ये अपॉईंटमेंट मिळाली असती. परंतु आता 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मर्यांदेमध्ये हे अशक्य आहे, असे एका कंपनीच्या अधिका-य़ाने नमूद केले आहे. बुधवारी झालेल्या चर्चेचा रुग्णालयांच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या संबंधांवर परिणाम होणार नाही. परंतु लसीकरणाचे जे उपक्रम कार्यालयांत राबण्यात येत आहेत. त्यावर परिणाम होईल,असे सूत्रांनी सांगितले होते. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता आहे. ज्या ठिकाणी रुग्णालयांची साखळी नाही अशा ठिकाणी काही कंपन्या लसीकरणाचे उपक्रम राबवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.