पंतप्रधानांची छत्रपतींशी तुलना ?, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं BJP च्या ‘डझनभर’ नेत्यांकडून ‘प्रकाशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज दिल्ली येथे भाजपा कार्यालयात ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत’ अशा आशयाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. परंतु यातून नवा वाद उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे कारण मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कशी काय करू शकतात असा आरोप करण्यात येत आहे.

या पुस्तक प्रकाशनाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी शाम जाजू आणि माजी खासदार महेश गिरी आणि इतर काही नेते उपस्थित होते. याची माहिती भाजपाचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून दिली.

या पुस्तक प्रकाशनाची माहिती मिळताच या पुस्तकाला सोशल मीडियावरून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. कारण मोदींची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे चुकीचे आहे असे मत सर्वजण मांडत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/