‘राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर देईन पोटगी’ ; ‘त्याचा’ न्यायालयात अजब दावा 

इंदौर : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सत्तेत आल्यास ते मला ७२ हजार देणार आहेत, त्यानंतर मी पत्नीला ४ हजार ५०० रुपयाची पोटगी देईन. सध्या मी बेरोजगार असल्याने पोटगी देण्यास असमर्थ आहे. असा अजब दावा इंदूरच्या एका व्यक्तीने कौटुंबिक न्यायालयात केला आहे. राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबाच्या खात्यात वर्षाला ७२ हजार जमा करण्याचं आश्वासन नुकतंच दिलं. राहुल गांधी यांच्या या निवडणूक घोषणेच्या आधारे आनंद शर्मा यांनी चक्क प्रतिज्ञापत्रावर लिहून दिल आहे.

इंदूरच्या कुटुंब न्यायालयात आनंद शर्मा यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. कौटुंबिक न्यायालयानं आनंद यांनी पत्नी आणि मुलीला पोटगी म्हणून महिना ४,५०० रुपये देण्याचे आदेश दिले. त्यावर आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, ‘मी बेरोजगार असून कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार मी महिना ४,५०० रूपये देण्यास असमर्थ आहे. राहुल गांधी यांचं सरकार आल्यानंतर गरिबांना, बेरोजगारांना महिना ६ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी असं लिहून देतो की, राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मला मिळणाऱ्या ६ हजारांपैकी ४ हजार ५०० रुपये मी पत्नीला देईन. न्यायालय त्या वेळी पोटगी पत्नीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देऊ शकतं’,

आनंद शर्मा यांच्या दाव्यामुळे न्यायालयातील उपस्थित सर्व आवाक झाले. दरम्यान, या केसची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे. या आदेशामध्ये न्यायालयाने पत्नीला महिना ३ हजार रुपये आणि मुलीला महिना दिड हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. आनंद शर्मा याचा २००६ मध्ये विवाह झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1110098032597655553

राहुल गांधींची घोषणा

काँग्रेस सत्तेवर आली तर देशातल्या गरीबांना वर्षाला ७२ हजार रुपये देऊ अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. देशात २० टक्के गरीब असून त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. देशात भरपूर पैसे असून हे पैसे देणे शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्यांचं उत्पन्न १२ हजारांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.