विरोधी पक्षनेतापदासाठी ‘या’ 3 नेत्यांमध्ये ‘रस्सीखेच’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्त जागा मिळाल्या आहे. एकट्या भाजपानेही 100 चा आकडा पार केला आहे. यानंतर शिवसेनेनेही 56 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचच सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु भाजप सेनेनंतर आता जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षात म्हणजेच जागांचा विचार करता तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पक्षात विरोधी पक्षनेतापदासाठी रस्सीखेच होणार अशी चिन्हं दिसत आहेत. कारण या पक्षात एकापेक्षा एक दिग्गज नेते आहेत.

शिवसेनेनंतर जास्त जागा मिळवणारा तिसरा पक्ष ठरला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या आहेत. सध्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु होणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. असे असले तरी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहेत. या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावे आहेत. धनंजय मंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले आहे. पंरतु या पदासाठी असणारी निवड नक्कीच सोपी नसणार आहे.

‘विरोधी पक्षेनेता चर्चेनंतर ठरणार’ : थोरात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच विरोधी पक्षनेता होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबत थोरात म्हणाले की, “विरोधी पक्षनेता कोण असणार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी क्राँग्रेस चर्चा करून निर्णय घेतील. सत्ता स्थापन करण्याएवढ्या जागा जरी आम्हाला मिळाल्या नसल्या तरी ज्या जागा मिळाल्या आहेत त्या समाधानकारक आहेत” असेही ते म्हणाले.

Visit : policenama.com