Competitive Examination | काय सांगता ! होय, ‘या’ राज्यात स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना नाही द्यावी लागणार मुलाखत

पोलीसनामा ऑनलाइन – आंध्र प्रदेश सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत (Andhra Pradesh Public Service Commission) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने गट -1 सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखत प्रक्रिया रद्द केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे प्रधान सचिव आदित्यनाथ दास यांनी दिली.

ED ने सोडवले पूर्ण ’कोडे’, सांगितले कशाप्रकारे सचिन वाझेने माजी गृहमंत्री देशमुख यांच्यापर्यंत पोहचवले कोट्यवधी रुपये

आंध्र सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान यापूर्वी आंध्र सरकारने 2019 मध्ये गट -1 वगळता विविध पदांसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी आणि उपायुक्त या पदांचा समावेश होता.

Sharad Pawar | ‘महाविकास’ सरकार 5 वर्षे टिकणार, तिन्ही पक्षात मतभेद नाहीत’

आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (APPSC) भरती प्रक्रियेमध्ये सरकार पारदर्शकता आणण्यासाठी
सरकारने हा निर्णय घेतला आहे. एपीपीएससीने ( Andhra Pradesh Public Service
Commission) 18 ऑक्टोबर 2019 रोजी गट -1, गट -2 आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसह सर्व
भरती परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा प्रस्ताव दिला होता.

Former MLA Mohan Joshi | सत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा – माजी आमदार मोहन जोशी

त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता. आता सरकारने आदेश जारी
केल्यावनंतर गट -1 च्या पदांसह आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांची मुलाखत पद्धत रद्द
करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, हा नियम शनिवारनंतर दिलेल्या भरती अधिसूचनेवरच
लागू होईल असे प्रधान सचिव दास यांनी सांगितले आहे.

 
ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : competitive examination | Candidate In The Competitive Examination Will Not Have To Pay For The Interview Decision Was Made By This Ap State 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update