प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या तक्रारी येत आहेत असे समजताच कार्यकर्त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अ‍ॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याचदरम्यान, अकोला लोकसभा मतदार संघामध्ये विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मतदान प्रक्रियेस उशीर होत आहे. इतकेच नव्हे तर, मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याच्या प्रकारामुळे ईव्हीएम मशिन हॅक होण्याच्या चर्चाही होत आहेत.

त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या तक्रारी येत आहेत असे समजताच कार्यकर्त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अ‍ॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. इतकेच नव्हे तर, जितका वेळ मशीन बंद आहे. तितका वेळ मतदानासाठी वाढवून देण्याची मागणीही करावी असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीच्या समोरचे बटन दाबले तरी कमळालाच मतदान जात आहे. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या समोरील बटन दबत नाही. मोदींना सत्तेतून जाण्याची भिती असल्याने मोदी हे कृत्य करत आहेत. असा गंभीर आरोप सुजात आंबडेकर यांनी केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like