पुणे : फसवणूक प्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विकत घेतलेल्या रोहाऊस साठी स्टॅम्पड्युटीसाठी पैसे घेऊन स्टॅम्प ड्युटी न भरता फसवणूक केल्या प्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमोल आनंदराव पाटील (वय ३९, रा. जुनातोफखाना) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकीलाचे नाव आहे. याबाबत वाघोली येथील 37 वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 28 जून 2019 दरम्यान शिवाजीनगर येथील जुना तोफखाना चौकातील वकीलाच्या कार्यालयात घडली आहे. फिर्यादी हे एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांनी एक रो-हाऊस खरेदी केले होते. रो-हाऊसचे खरेदीखत आणि स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी पाटील याने फिर्यादी यांच्याकडून 3 लाख 47 हजार रूपये घेतले.

परंतु, त्याबदल्यात त्यांना कोणतेही खरेदीखत करून दिले नाही. तसेच स्टॅम्प ड्युटीही भरली नाही. तसेच पैसेही परत दिले नाही. त्याने पैशाच्या हमीपोटी बंद असलेल्या खात्याचा धनादेश जाणीवपुर्वक दिला आणि फिर्यादींची फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या विरूध्द खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्याने दिली. याप्रकरणी फिर्यादीने अर्ज दिला होता. त्याची चौकशी करण्यात आली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. एम. चव्हाण हे करत आहेत.

Visit : Policenama.com