पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅन्स क्लबची जोरदार मागणी, नागपुरात तक्रार दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर केल्याप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करा आणि त्यांच्या ‘रिपब्लिकन भारत’ या चॅनलविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅन्स क्लब यांच्या वतीने एका तक्रारीतून आज मंगळवारी पोलिसांकडे केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिली आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लब यांनी केला आहे. तसेच या क्लबने पत्रकार अर्णब गोस्वामीचा निषेध नोंदविला आहे.

या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी या तक्रारीची दखल घेतलीय. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनिश पांडे यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे, त्यानुसार, ‘रिपब्लिकन भारत’ या चॅनेलचे संपादक, पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला आहे. गोस्वामी यांनी या माध्यमातून सरकार पाडण्याची धमकी देत आहे, असाही आरोपही तक्रारीमध्ये केला आहे.

‘रिपब्लिकन भारत’ या चॅनेलचे संपादक, पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे वक्तव्य आणि कृती निषेधार्ह आहे. गोस्वामी हे समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पत्रकार अर्णाब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी. त्यांच्या ‘रिपब्लिकन भारत’ या चॅनेलवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रवनीश पांडे यांनी तक्रारीमधून केली आहे.

आज मंगळवारी दुपारी फॅन्स क्लबचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीसोबत व्हिडीओ क्लिप देखील पोलिसांना दिलीय. पुढील कारवाईसाठी हि तक्रार वरिष्ठांकडे पाठवली आहे.

ही आहे दुसरी तक्रार; चौकशी सुरु
संपादक,पत्रकार गोस्वामी यांच्याविरुद्ध याअगोदरही नागपूर येथे एक तक्रार दाखल झाली होती. आजची ही दुसरी तक्रार आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष शाखेतर्फेही चौकशी सुरू केली आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त नीलोत्पल म्हणाले की, या तक्रारीची आणि व्हिडीओ क्लिपची आम्ही चौकशी करत आहे. मुंबईमध्येही असा काही गुन्हा दाखल झाला का?, त्याची चौकशी करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like