मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबाबत नको ते शब्द, नारायण राणेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ असे शब्द भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वापरले होते. आता याप्रकरणी राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राणेंनी भाषणातून मुख्यमंत्र्यांचा अपमान केला असून कलम ५०४, ५०६ नुसार अदखलपात्र एनसी दाखल करण्यात आली आहे.

काय म्हटले तक्रारी मध्ये !
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले की, “शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी टीका केली. प्रसार माध्यमे आणि समजा माध्यमाच्या माध्यमातून राणेंनी उद्धव ठाकरे यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही, पुळचट आणि बुद्धू मुख्यमंत्री, गांडूळ, याची लायकी नाही, तसेच मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव्य आहे, अशी शिवीगाळ आणि दमदाटीची भाषा वापरुन सर्वसामान्य आणि शिवसैनिकांचा अपमान केला आहे. तक्रार दाखल करुन कारवाई न केल्यास सोमवारी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल,” असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे साधला होता निशाणा
कोरोनाच्या अनुषंगाने यंदाचा दसरा मेळावा सावरकर स्मृती स्थळ येथे आयोजित केला होता. तेव्हा बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांनी आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले होते.

त्याला उत्तर देताना राणे म्हणाले की, आजवर जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषण शैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला आताचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणांवर टीका करायची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे त्यांनी म्हटले होते.

You might also like