धक्कादायक ! पतीनंच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला ठार मारलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डीफाटा येथील म्हाडा प्रकल्पाच्या सी विंगमधील दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत शनिवारी दुपारी एका गरोदर विवाहितेचा (husband-kills-pregnant-wife) खून झाल्याची घटना घडली होती. यापक्ररणी रात्री उशिरा विवाहितेच्या वडिलांनी जावयाविरुध्द खूनाचा संशयाची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पतीला अटक केली आहे. दरम्यान आरोपीनेच घरात चोर आल्याचा बनाव केल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात स्पष्ट झाले आहे.

प्रमीला भरत जाधव (वय 26) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. भरत ढवळा जाधव (28, रा.फ्लॅट 1002, म्हाडा इमारत) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सासरा तानाजी सावळीराम कचरे (५४, रा. कचरवाडी, ता. इगतपुरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमीला (26) हिचा विवाह दोन वर्षांपुर्वी भरतसोबत विवाह झाला. सुरुवातीला भरत आणि प्रमीला पांडवलेणी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. वर्षभरापुर्वीच फिर्यादी तानाजी कचरे यांचा भाचा सचिन झोळे याच्या मालकीच्या म्हाडा इमारतमधील ते सदनिकेत राहण्यासाठी आले होते. प्रमीलाचा पती संशयित भरत याने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क करून चोरटे घरात येऊन दागिणे लंपास करून माझ्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले होते.

मात्र मयत प्रमिलाच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांकडून नमुद केलेली मृत्युची वेळ आणि घटना यांच्यात मोठी तफावत असल्याने पोलिसांचा भरतवर अधिक संशय बळावला. तसेच घरात कुठल्याही प्रकारची मोठी रोकड नव्हती आणि प्रमीलाच्या अंगावर केवळ मंगळसुत्र आणि कानातले टॉप्सव्यतिरिक्त अन्य दागिणे नव्हते. तसेच घरातील कुठलेही सामान अस्ताव्यस्त झालेले नाही, आणि काही चोरीसुध्दा झाले नाही, असे फिर्यादीने म्हटले आहे. माझा जावई भरत यानेच प्रमीलाचे तोंड उशीने दाबून व गळा टॉवेलने आवळून ठार मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर हे करीत आहेत.

खुनाची कबुलीही नाही
प्रमीलाचा तिचा पती भरत जाधव यानेच खून केल्याचा संशय फिर्यादीत कचरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नाही. त्याने केलेल्या बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती देत नसल्याने प्रमीलाचा खून भरत ने का केला असावा? याचे कारण रविवारी रात्री समजू शकले नाही. भरत यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.