माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर आणि त्यांच्या पत्नीविरूध्द फसवणूकीचा ‘FIR’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर आणि त्यांच्या पत्नी फरहीन प्रभाकर, मुलगा, सहकारी संजीव गोयल आणि 2 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मनोज प्रभाकर आणि अन्य लोकांवर लंडनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलाच्या फ्लॅट ताब्यात घेण्याचा धमकी देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. महिलेचे नाव संध्या शर्मा पंडित आहे. एक रिपोर्टनुसार सर्वप्रिया विहारच्या एका अपार्टमेंडमध्ये महिलेचे दुसऱ्या मजल्यावर घर आहे, त्या अपार्टमेंटच्या पहिल्या फ्लोरवर मनोज प्रभाकर राहतात.

आरोपानुसार, फ्लॅटची खोटी कागदपत्र तयार करुन महिलेच्या फ्लॅटचे कुलूप तोडले आणि एका ओळखीच्या व्यक्तीला राहण्यासाठी देण्यात आला. तक्रारीत हे देखील आहे की महिलेचे पूर्ण सामान देखील चोरीला गेले आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यात असे ही म्हणले आहे की महिलेला जीवानीशी मारण्याची धमकी देण्यात येत आहे आणि दीड कोटी रुपयांची मागणी केली जात आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी