‘त्या’ तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यावर गुन्हा

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन – धोकादायक झाड डोक्यावर पडून तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

राहूल अशोक सावंत (वय २८) या तरुणाचा ११ मार्च रोजी डोक्यावर धोकादायक झाड पडून त्याचा मृत्यू झाला होता. तर वसई विरार पोलिसांनी याप्रकरणी तत्कालीन अधिकारी सुरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राहूल सावंत हा नालासोपारा पुर्वेकडील परिसरात राहणाऱा राहूल सावंत हा २५ फेब्रुवारी रोजी वसंत नगरी सेक्टर नंबर १ मधील श्रीविना सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून रात्री साडेआठच्या सुमारास जात होता. तेव्हा सोसायटीतील धोकादायक झाड त्याच्या डोक्यावर पडले. त्यामुळे त्याचा उपचारदरम्यान ११ मार्च रोजी मृत्यू झाला. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर वसई विरार शहर महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणने धोकादायक झाड न कापल्याने राहूलचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तत्कालीन अधिकारी सुरेंद्र पाटील यांच्यावर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.