मोदींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख चौकीदार असा करतात. किंवा अनेकदा त्यांच्या भाषणावेळी सभेत चौकीदार चोर है अशा घोषणाही अनेकदा दिल्या जातात. परंतु आता राहुल गांधींविरोधात बिकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकतीच काँग्रेसची मुंबईतील सभा पार पडली. त्यात चौकीदार चोर है च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणेविरोधात तक्रार करण्यात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन तर्फे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चौकीदाराला चोर म्हटल्याने सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी माफीही मागावी अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान बिकेसी पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेतली आहे. या प्रकरणाची पोलीस अधिक तपासणी करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

काँग्रेस पक्ष नेहमीच मोदी आणि भाजपावर टीका करताना मोदींचा उल्लेख चौकीदार असा करत असते. शिवाय चौकीदार चोर या घोषणेचाही वापर करत असते. परंतु यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ह्याही बातम्या वाचा –

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !