प्रक्षोभक ट्वीट ! अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटरविरोधात FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (ghaziabad) एका वृद्धाला झालेल्या मारहाणीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या घटनेनंतर प्रक्षोभक व जातीय तेढ निर्माण करणारे ट्विट (Tweet) केल्याबद्दल दिल्लीच्या टिळक मार्ग पोलीस ठाण्यात (Delhi Police) बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, ( swara bhaskar) ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी ( Manish Maheshwari) तसेच इतर काही लोकांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

complaint against swara bhaskar twitter india over ghaziabad video

गाझियाबादच्या (ghaziabad) लोणी भागात एका दाढीवाल्या वृद्धाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. व्हिडिओत केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे पोलिसांनी तपासाअंती सांगितले होते. सोशल मीडियावरही (Social media) या विषयावरून गदारोळ चालू आहे. या प्रकरणात काही लोकांनी प्रक्षोभक व जातीय तेढ वाढविणारे ट्विट केल्याचे सांगत ॲड. अमित आचार्य (Adv. Amit Acharya) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात अद्याप एफआयआर (FIR) दाखल झाला नाही. विशेष म्हणजे गाझियाबाद पोलिसांनी यापूर्वीच ट्विटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या वादग्रस्त टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी बंगळूरू येथे जाऊन ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांची गेल्या महिन्यात चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Wab Title :- complaint against swara bhaskar twitter india over ghaziabad video

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज