‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडियावर अशोभनीय कॅप्शनसोबत अभिनेता साहिल खानचा फेक फोटो शेअर केल्यामुळे दोन महिला आणि ३ लोकांवर तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. अभिनेत्याने केलेल्या तक्रारीमध्ये असे समजले आहे की, जे के पेट्टी आणि करणधीरने आपत्तिजनक कॅप्शनसोबत अभिनेता साहिलचा फेक फोटो २३ मे ते ६ जून यादिवसात इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

साहिलने तक्रारीमध्ये सांगितले की, सोशल मिडियावर या पोस्टमुळे त्याच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचले आहे. गुरुवारी पोलिसांनी महिला व त्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडचा अभिनेता साहिल खानने स्टीरियो नेशनच्या म्यूजिकल व्हिडिओ ‘नचांगे सारी रात’ मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. नंतर त्याने हिंदी कॉमेडी चित्रपट ‘स्टाइल’चित्रपटात काम केले होते. यानंतर तो ‘एक्सक्यूज मी’ चित्रपटात दिसला.

सायबर क्राइमबद्दल बोलायचे म्हणले तर, महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध गायक आदनान सामी देखील सोशल अकाउंट ‘हॅक’ अशा समस्यांना सामोरे गेले आहेत. पहिले अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हॅक झाले होते. त्यांच्या डिस्प्ले पिक्चरला पाकिस्तानच्या पीएम इमरान खान यांचा फोटो दिसत होता. यानंतर गायक आदनान सामी यांच्यासोबत ही असेच झाले होते.