MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या औरंगाबादचे राजकारण जोर धरत आहे. दोन तीन दिवसांत औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी दाखल केली आहे. आपल्या जीवाला जलील यांच्याकडून धोका असल्याचे सांगत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

काही दिवंसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केले होते की, ‘ शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना आता चिरडावे लागेल. याची सुरुवात बेगमपुरा भागातून करावी लागेल. तसेच बेगमपुरा भागात अफसर खान यांचा पत्त्याचा क्लब चालतो. तो मी बंद करणारच.’ त्यानंतर जलील यांच्या भाषणातील हाच मुद्दा पकडत नगरसेवक अफसर खान यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. माझ्या जीवास काही झाले तर इम्तियाज जलील जबाबदार राहतील. तसंच एमआयएमचे काम केले नाही म्हणून मला धमक्या दिल्या जातात, असा आरोप अफसर यांनी केला.

दरम्यान, कालपासून औरंगाबादच्या राजकारणाला नवीन वळण लागले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडावा म्हणत प्रचंड गोंधळ घातला.

तेव्हा त्यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयएमच्या २० नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते. आता इम्तियाज जलील यांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like