आंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधातच गुन्हा दाखल ; लातूर प्राशासनाचा ‘अजब’ कारभार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लातुरमधील शिक्षकांनी आंदोलन केले होते. परंतू त्यांच्या मागण्यांवर लक्ष न देता उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तिन्हीही विद्यालयात संस्थाचालकांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यामुळे या विद्यालयातील शिक्षक त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलेले. मात्र हे त्यांच्याच आंगाशी आल्याचे दिसत आहे.

योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थचे संस्थाचालक रामदास पवार आणि त्याच्या कुटुंबियाच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीला तेथील शिक्षक कंटाळले आहेत. कोणाचीही काही तक्रार करायला गेले तर नोकरासारखे वागणूक दिली जाते.

अश्लील भाषेत शिवीगाळ केली जाते, असा आरोप संस्थेतील शिक्षकांनी केला. तसंच हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरु आहे. तसंच यापूर्वीही काही शिक्षकांनी या संस्थाचालकाविरोधात तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षकांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.

निर्णय़ानुसार शिक्षकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनामागे शाळेच्या इमारतीसाठी शिक्षकांकडून घेतलेले पैसे परत करावेत, रंगकामासाठी प्रत्येक शिक्षकाकडून घेतलेले 28 हजार रुपये परत करावेत. महिला शिक्षकांना आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संस्था सचिव व त्यांचा मुलगा किरण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

तसंच पगार वेळेवर द्यावेत या मागण्या होत्या. मागण्यांकडे दुर्लक्ष होत होते. त्यावर उपोषणाच्या पाचव्या दिवशी शिक्षक संतप्त झाले आणि शिक्षणाधिकऱ्यांच्या केबिनमध्ये प्रचंड गोंधळ घातला. विशेष म्हणजे आंदोलनातील एका शिक्षिकेने तर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं आणि पेटवण्याचा प्रयत्न केला. ही घटना धक्का देणारी ठरली. या घटनेची दखल लातूर जिल्हापरिषदेचे सीईओ बिपीन इटनकर यांनी घेतली. इटनकर यांनी स्वत: शिक्षकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

दरम्यान, काल दुपारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्य़ात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी सोळा शिक्षक फरार आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

You might also like