आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवणे आणि रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुकी केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेल्या थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ दिला नसल्याचा जाब विचारणाऱ्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B075BCSFNN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5f99148-a8f2-11e8-b0a0-05824187c05d’]

या प्रकरणी प्रशांत मधुकर गायकवाड (२९, रा. ठाणे) ह्या स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. तर प्रशासकीय अधिकारी शिल्पी व पीआरओ पवार आणि एका बाऊन्सरवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ सागर राणे ह्या दहा महिन्याच्या मुलाला १५ आॅगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधितांना तब्बल सात दिवसांनी कोटेशन दिले. या गलथान कारभाराने त्या बालकाला त्याचा लाभ मिळाला नाही. दोन दिवसांनी ते बालकही मयत झाले. विचारणा करण्यास गेलेल्या स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत गायकवाड व त्यांचे सहकारी विक्रम कदम यांना कुठलीही माहिती न देता उद्धट वर्तन केले तर येथील बाऊन्सरने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली म्हणून या तिघांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी याच आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओसह तिघांविरुद्ध आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवणे आणि रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये शुक्रवारी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांच्यासह राजेश दुबेध या दोघांना वाकड पोलिसांनी अटक करुन लगेचच पोलीस ठाण्यात जामीन मंजूर करुन सोडून देण्यात आले आहे. तीन दिवसात वाकड पोलिस ठाण्यात दोन गुन्न्हे दाखल झाले आहेत.