Sangli News : महापालिकेतील घोटाळ्याची थेट राज्यपालांकडे तक्रार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेत झालेल्या लेखापरीक्षणातून दीड हजार कोटींचा गैरकारभार झाल्याचे समोर आले आहे. मात्र, सरकारकडून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालत राज्य सरकारला कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणी नागरिक हक्क संघटनेने केली आहे.

एका निवेदन प्रसिद्ध करत नागरिक हक्क संघटनेचे बर्वे म्हणाले, पालिकेतील गैरकारभाराबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवला. त्यानंतर चार लेखापरीक्षणे झाली. त्यात दीड हजार कोटींचा गैरकारभार झाल्याचे उघड झाले. त्यात भार-अधिकारही लागला. परिणामी, न्यायालयाने याप्रकरणात सरकार आणि पालिकेला कारवाई व वसुलीचे आदेश देऊनही कारवाई झाली नाही. आम्ही न्यायालयात अवमान याची दाखल करुन सुद्धा कारवाई होत नाही.

दरम्यान, भाजपची महापालिकेत एकहाती सत्ता आहे. मात्र, अडीच ते तीन वर्षात पाठपुरावा करुन सुद्धा संबंधितांवर कारवाई होत नसल्याने, त्याची वसुली लागत नाही. म्हणून तात्काळ गैरकारभाराबाबत चौकशी करुन कारवाई करावी, सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी करावी. ४३ नगरसेवकांपैकी मूळ चारच नगरसेवक भाजपचे असल्याने सत्ताबदल झाल्यानंतर ते परत फिरतील. पण बदनामीला भाजपलाच सामोरे जावे लागणार असल्याचे बर्वेनी सांगितले.