Anil Parab : ‘माझ्या आणि अधिकाऱ्यांविरोधातील तक्रार पूर्णतः निराधार व खोटी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक मधील एका निलंबित प्रादेशिक अधिकाऱ्याने शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीवरून माझ्या आणि अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधातील ही तक्रार पूर्णतः निराधार आणि खोटी असल्याचा दावा मंत्री अनिल परब यांनी केलाय. अनिल परब म्हणाले, निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध आणि परिवहन आयुक्त व अन्य ५ अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस ठाणे नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी आणि महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, अशी जोरदार टीका मंत्री अनिल परब Anil Parab यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

पुढे परब म्हणाले, ‘मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून हाय कोर्टामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार आणि मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे अशा या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. तसेच, ‘या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीमध्ये सत्य जनतेसमोर नक्कीच येईल असे देखील अनिल परब यांनी म्हटले आहे.

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

या दरम्यान, निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी अनिल परब यांच्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पदोन्नतीमध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप गजेंद्र पाटील यांनी केलाय. या प्रकरणाचा रिपोर्ट तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हे शाखेला दिलेत. तसेच, तक्रारदार गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता देखील आहे.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार