आदित्य पांचोलीविरोधात मारहाण, शोषणाची तक्रार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता आदित्य पांचोलीच्या विरोधात एक प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीने आदित्यवर गंभीर आरोप केले आहे. मुंबईत वर्सौवा पोलिसांकडे तक्रार केली आहे. आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि शोषणाची तक्रार दाखल केली आहे. ही घटना अभिनेत्रीच्या करिअरच्या सुरुवातील जवळपास १० वर्षापूर्वी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीकडून ई-मेलच्या माध्यमातून तक्रार आल्यानंतर अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ‘ई-मेल द्वारे तक्रार मिळाल्यानंतर संबधित अभिनेत्रीशी आम्ही संपर्क केला. ही घटना १२ वर्षापूर्वीची असल्याने एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. आदित्य पांचोलीच्या पत्नीला घटनेबद्दल ठाऊक होते, असे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही बाजूंची सखोल चौकशी केल्यानंतर, जबाब नोंदवून घेतल्यानंतर पुढील कारवाई करु, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

आदित्यने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने सांगितले की, मी आधीच या अभिनेत्रीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यानंतर अभिनेत्रीच्या वकिलाने याचवर्षी ६ जानेवारीला मला धमकी दिली. मी ही त्यांना अब्रुनुकसानीचा दावा मागे घ्यावा अशी धमकी दिली होती. १८ मिनिटाचे हे संभाषण मी रेकॉर्ड केले होते. हे पुरावे मी पोलिसांना व कोर्टात दिले आहे. २५ एप्रिल वर्सोवा पोलीस जेव्हा माझ्या घरी नोटीस घेऊन आले त्यावेळी मला धक्का बसला. हा माझ्याविरोधात कट रचला जात आहे.