पेट्रोलिंगच्या नावाखाली पोलिसाचे विवाहित महिलेशी अश्लील वर्तन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – विवाहित महिलेला फोनवर शिवीगाळ करुन तिला गुन्ह्या दाखल करण्याची धमकी देऊन विनयभंग केला. याप्रकरणी एका पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रघुनाथ बागडे असे या पोलिसाचे नाव असून महिलांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला हा जिल्ह्यातील पाचवा पोलीस आहे. बागडे हा पेट्रोलिंगच्या बहाण्याने घराची झडती घ्यायचं सांगत  रात्रीबेरात्री विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील वर्तन करीत होता.
अमळनेर पोलिसात तपास पथकात कार्यरत असणाऱ्या प्रमोद बागडे याने एका विवाहित महिलेला तिऱ्हाईत व्यक्तीकडून दोनदा फोन केले. यानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन वारंवार केस करण्याची धमकी देत होता. प्रमोद येने ३१ ऑक्टोबरला रात्री १० वाजता पीडित महिलेच्या घरी गेला आणि त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद या विवाहितेच्या वडिलांनी दिली. त्यावरुन अमळनेर पोलिसात बागडेविरोधात कलम ४५१, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान इनकॅमेरा जबाब देऊन महिला घरी गेल्यानंतर तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी जिल्ह्यातील महिलांशी असभ्य वर्तन केल्याने चार पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यात परवेझ शेख, योगेश वाघ, सागर तडवी आणि विनोद अहिरे (सर्व जळगाव) या पोलिसांचा समावेश आहे.
जाहिरात