‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाविरोधात पुण्यात पोलीसांकडे तक्रार दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून देशभरात गोंधळ माजला असताना पुण्यात शिवप्रेमींनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. लेखकासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, पुस्तकावर बंदी घालावी असेही म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधिरीत ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या नावाने असणार्‍या पुस्तकाचे नुकतेच दिल्लीतील भाजप कार्यालयात उद्घाटन झाले. हे पुस्तक जय भगवान गोयल लिहीले आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्रसह देशभरात यावरून वादंग सुरू झाले आहे. राज्यात राजकीय पक्षांसह सर्व सामान्य नागरिक तसेच शिवप्रेमींनी तीव्र विरोध करत मोर्चे काढले आहेत. तसेच, पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. परंतु, पुण्यातील हडपसर परिसरातील शिवप्रेमी महेश टेळे, उत्तम कामठे, अनिल बोटे तसेच रमजान शेख यांनी पुस्तकाविरोधात थेट हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच, लेखक, प्रकाशक आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षांंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. शिवरायांची बदनामी आणि त्यांचे कर्तुत्व झाकाळण्याचा खोडासाळपणा सुरू आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/