निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांशिवाय इतरांना प्रवेश नसतो. तरीही नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर जाऊन वाद घातला. त्यामुळे नाना पटोलेंसह कार्यकर्ते प्रशांत पवार आणि काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह २० अज्ञात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झाला आहे. तर निवडणूक अधिकारी व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात कोणती मशीन निवडावी याची प्रक्रिया केली जाते. त्यात निवडीच्या वेळी नाना पटोलेंसह अभिजित वंजारी आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दबाव आणला तसंच तेथे घोषणाबाजीही केली. त्यावरून त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, नागपूरमधून केंद्रीय मंत्री भाजपचे नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले हे लोकसभेच्या रिंगणात होते. यात नाना पटोलेंचा दारून पराभव झाला. तर नितीन गडकरी यांनी दोन लाख मताधिक्याने निवडणूक जिंकली.