… म्हणून बीड जिल्हयातील 12 गावात ‘कडक’ संचारबंदी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला असून बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 56 वर पोहोचला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात 12 गावात पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बीडमध्ये कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीने शहरात अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहे. दुचाकीवर फिरून हा रुग्ण कोरोनाचा वाहक ठरला आहे. त्याने दिलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यामुळे खबरदरी म्हणून पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरासह जिल्ह्यातील बारा गावात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे.

जिल्ह्यात 46 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर उपचारानंतर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात मुंबई, पुण्यावरून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याच आढळून आले आहे. शहरासह 12 गावात संपूर्ण कर्फ्यू लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवामध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार असल्याचे आदेशा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.