मोनालिसाच्या करिअरची सविस्तर कहाणी ! ‘भोले शंकर’पासून सुरू झालेला किस्सा आता Instagram भरोसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा (Monalisa) बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकीनीत दिसली होती. मोनानं अनेक भाषांतील सिनेमात काम केलं आहे. परंतु तिला खरी ओळख मात्र भोजपुरी सिनेमातून मळाली. 2007 साली तिनं भोजपुरी सिनेमात पाऊल टाकलं होतं. आजवर तिनं 100 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती टीव्हीमध्ये सक्रिय आहे. आता सध्या ती इंस्टावर जास्त अ‍ॅक्टिव्ह दिसत आहे.

एकवेळ अशी होती जेव्हा तिला बंगाल की ब्यूटी म्हटलं जात होतं. कॉलेजच्या दिवसातच तिनं उडीया भाषेतील टीव्ही मालिकेत आणि व्हिडिओ अलबममध्ये काम करायला सुरुवात केली होती. 1997 साली हंसल मेहताच्या जयते सिनेमातून तिनं हिंदी सिनेमात पाऊल टाकलं होतं. कल्पना लाजमीचा सिनेमा दामन ए व्हिक्टीम ऑफ मॅरिटल व्हायलन्समध्ये तिनं एक आयटम नंबर करताना दिसली होती. 2004 साली आलेल्या टीएलव्ही प्रसादच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या तौबा तौबा या सिनेमात मोनालिसानं सेक्स कॉमेडी केली होती. यानंतरही ती अब बस, एक ही भूल, जलवा फन इन लव, बंटी और बबली, ब्लॅकमेल, बॉबी, लव अँड लस्ट, हाफ फ्राय हैद्राबादी, लव गुरू, काफिला अशा सिनेमात लहान मोठ्या भूमिका करत राहिली.

यानंतर तिनं उडीया आणि बंगाली सिनेमातही काम केलं. यानंतर तिनं 2006 आणि 2008 साली 2 कन्नड सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. 2007 साली ती तेलगू सिनेमातील एका गाण्यावर डान्स करताना दिसली. विविध भाषांतील अनेक सिनेमात काम केल्यानंतर तिनं भोजपुरी सिनेमात पाऊल टाकलं.

2007 साली तिचा पहिला भोजपुरी सिनेमा रिलीज झाला. श्रीमान ड्रायव्हरबाबू असं या सिनेमाचं नाव होतं. परंतु भोजपुरी सिनेमातील खरं लाँचिंग तिनं भोले शंकर सिनेमातून केलं होतं. या सिनेमात तिनं मनोज तिवारी आणि मिथुन चक्रवर्ती सोबत प्रमुख भूमिका साकारली होती. त्या काळात एवढा हिट झालेला मिथुन चक्रवर्तीचा हा एकमेव भोजपुरी सिनेमा आहे.

यानंतर मोनालिसा भोजपुरी सिनेमातील मोठं नाव बनली. तिनं भोजपुरीमधील जवळपास सर्वच बड्या कलाकारांसोबत काम केलं. यात पवन सिंह, रवी किशन, खेसारी लाल यादव अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

मोनालिसानं हिंदी भाषेतील टीव्ही मालिकेतही चांगलं काम केलं आहे. 2012 मध्ये ती दिनेश लाल यादवचा बिग बॉसच्या 6 व्या सीजनमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आली होती. नच बलिए या डान्सवर आधारीत रिअ‍ॅलिटी शोच्या 8 व्या सीजनमध्ये तिनं विक्रांत सिंह राजपूत सोबत भाग घेतला होता. याच वर्षी तिनं विक्रांत सोबत लग्न केलं. यानंतर मोनालिसा प्रसिद्ध मालिका नजर आणि दिव्य दृष्टीमध्ये दिसली होती.

भोजपुरी सिनेमात काम करणाऱ्या अनेक अ‍ॅक्ट्रेसचं करिअर उतरत्या तारुण्यात संपून जातं. प्रौढ अभिनेत्रींसाठी प्रादेशिक सिनेमे कमी बनतात. मोनालिसा सोबत असंच काहीसं झालं आहे.

सध्या मोनालिसा सोशलवर जास्त अ‍ॅक्टिव्ह दिसते. आपल्या हॉटनेसमुळं ती कायमच चर्चेत येत असते. सोशलवर ती फोटो आणि व्हिडिओ कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचंही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरियलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मनी है तो हनी है, सरकार राज, गंगा पुत्र असे तिचे काही बॉलिवूड सिनेमे सांगता येतील. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये झळकली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषांतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.