‘सडक २’ चित्रपटाचे पहिले शेड्यूल पुर्ण, पूजा भट्टने शेअर केले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे निर्माते महेश भट्ट हे १९९० चा सुपरहिट चित्रपट ‘सडक’ चा सिक्वेल बनवित आहे. या रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपटामध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. आता ‘सडक २’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाच्या पहिल्या शुटिंगचे शेड्यूल पुर्ण झाले आहे. ‘सडक २’ चित्रपटाच्या पहिल्या शुटिंगचे शेड्यूल पुर्ण झाल्यानंतर पूजा भट्टने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

याआधी पहिल्या शुटिंगची सुरुवात करताना आलियाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन लिहले की, ‘मी खूप घाबरले आहे. आज ‘सडक २’ चा पहिला दिवस आहे. आणि माझे वडिल चित्रपटाचे निर्देशक आहे. मी काही दिवसातच शुटिंग करण्यास सुरुवात करेल. मला वाटते की, एका लहान उंदीरप्रमाणे एका उंचावर चढण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मला आशा आहे की मी त्या उंचावर पोहचेल. ज्यावेळी मी पडेल त्यावेळी मी पुन्हा उचांवर जाण्याचा प्रयत्न करेल.’

ती पुढे म्हणाली की, मला प्रत्येक पाऊल विचार करुन टाकावा लागेल. इथे चित्रपट, परिवार आणि स्वप्न यांची एकत्र यात्रा सुरु होणार आहे आणि आमच्यासाठी ही एक जर्नी असणार आहे.

https://www.instagram.com/p/Bwuh2kRhWSR/?utm_source=ig_embed