पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करा, विखेंची जिल्हा प्रशासनाला सूचना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात पावसाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणेस आवश्यक मार्गदर्शक सूचना तातडीने द्याव्यात, आवश्यक त्या मनुष्यबळासाठी कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्याची मदत घ्यावी, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकार्याची बैठक घेतली. जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील, निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, सभापती रामदास भोर, जि.प.सदस्य संदेश कार्ले, वसंतराव कापरे, बाळासाहेब हराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

ना.विखे जिल्ह्यात नूकसान झालेल्या परिस्थितीचा तसेच सुरू असलेल्या पंचनाम्याच्या वस्तूस्थितीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवराम जगताप निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील सभापती रामदास भोर वसंतराव कापरे बाळासाहेब हराळ जि.प.सदस्य संदेश कार्ले आदी याप्रसंगी उपस्थित होते.

जिल्ह्यात ३ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून आता पर्यत ५७ हजार पंचनामे पूर्ण झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर पंचनाम्याबाबत गैरसमज निर्माण होत असून यासाठी जिल्हा प्रशासनाने लिखित स्वरूपात मार्गदर्शक सूचना पाठव्यावात अशा सूचना ना. विखे यांनी केली. मनुष्यबळ अपुरे असेल तर कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थाची मदत घ्यावी.एक आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याकरीता द्रोण आणि अ‍ॅपचा वापर करण्यासंदर्भात केलेल्या सूचना प्रशासनाने मान्य केल्या.

Visit : Policenama.com