30 जुनपूर्वी आवश्य उरकून घ्या तुमच्या पैशासंबंधित ‘ही’ 7 महत्त्वाची कामे, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारने कोरोना व्हायरसमुळे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही दिलासादायक घोषणा केल्या आहेत. सोबतच सरकारने टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणूक, पॅन ला आधारशी लिंक करण्यासह अनेक प्रकारच्या कामांसाठी अंतिम तारीख पुढे ढकलली होती, जेणेकरून लोकांना अडचणींना तोंड द्यायला लागू नये, यापैकी काही फायनान्शियल डेडलाईन जूनचा शेवटचा दिवसच आहे. अशी कोणती महत्वाची कामे आहेत जी 30 जून, 2020 पूर्वी उरकायची आहेत, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण ही कामे पूर्ण केली नाहीत, तर नुकसान होऊ शकते.
(1) केंद्र सरकारने पॅन ला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्चवरून वाढवून 30 जून 2020 केली होती. जर तुम्ही 30 जूनपर्यंत हे काम केले नाही तर पॅन अवैध होईल. यामुळे पॅनची आवश्यकता असणारे आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकणार नाहीत.
(2) आर्थिक वर्ष 2019-20 साठी टॅक्स वाचवण्याची कसरत पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2020 वरून वाढवून 30 जून 2020 केली होती. जर तुम्ही टॅक्स बचत योजनेत अजूनपर्यंत गुंतवणूक केली नसेल तर तुमच्या जवळ 30 जूनपर्यंत संधी आहे. तुम्ही 30 जूनपर्यंत 80 सी आणि 80 ड अंतर्गत टॅक्समध्ये सूट देणार्या योजनेत गुंतवणूक करू शकता.
(3) आर्थिक वर्ष 2018-19 साठी दुरूस्त आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख सुद्धा 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही हा आयटीआर दाखल केला नसेल तर रिवाइज्ड आयटीआर 30 जूनपर्यंत दाखल करायचा आहे.
(4) सरकारने एका अध्यादेशाद्वारे कंपनीसाठी फॉर्म-16 (पगारातून कापलेल्या टीडीएसचे प्रमाणपत्र) जारी करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढवली आहे. फॉर्म-16 मध्ये कंपनीकडून आर्थिक वर्षात कापलेल्या टॅक्सची पूर्ण माहिती असते. यासोबतच कर्मचार्याला दिलेले एकुण वेतन व भत्ते यांची माहिती असते. या फॉर्मच्या मदतीने आयटीआर दाखल करण्यात मदत होते.
(5) जर तुम्ही किमान वार्षिक जमा पीपीएफ खाते किंवा अन्य स्मॉल सव्हिंग स्कीमचे खाते उघउले आहे तर शेवटच्या तारखेनंतर जरूरी रक्कम जमा न केल्यास दंड आकारण्यात येतो. सध्या पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना खात्यात किमान रक्कम जमा न केल्यास दंड लागत आहे. पोस्ट खात्याने आर्थिक वर्ष 2019-20 साठी अशा बचत योजनांमध्ये किमान जमाची शेवटची तारीख 30 जूनपर्यंत वाढवली आहे, जी अगोदर 31 मार्च 2020 होती. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या रिकरिंग डिपॉझिट खात्यात एप्रिल आणि मे 2020 मध्ये पैसे जमा नाही करू शकलात तर 30 जूनपर्यंत कोणत्याही दंडाशिवाय गुंतवणूक करू शकता.
(6) जर तुम्ही 31 मार्च, 2020 ला मॅच्युअर होत असलेल्या पीपीएफ अकाऊंटला पुढे जारी ठेवू इच्छिता आणि लॉकडाऊनमुळे हे करता आले नसेल तर तुमच्याकडे हे करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ आहे. पोस्ट विभागाने 11 एप्रिलला जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, पीपीएफ अकाऊंट एक्सटेंड करण्याचा फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 30 जून करण्यात आली आहे.
(7) सरकारने फेब्रुवारी आणि एप्रिल 2020 च्या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना सीनियर सिटिजन स्कीम अकाऊंटमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 पर्यत वाढवली आहे. योजनेच्या नियमांनुसार, 55-60 वर्षांच्या सेवानिवृत्त व्यक्ती एससीएसएस स्कीममध्ये सेवानिवृत्ती लाभ मिळण्याच्या एक महिना आधी सुद्धा गुंतवणूक करू शकतात.