home page top 1

‘INS विक्रांत – 2’च्या हार्डवेअरची चोरी !

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – कोचीन येथील शिपयार्ड  लिमिटेडमध्ये काम सुरु असलेल्या ‘आयएनएस विक्रांत-2 या जहाजाचे काही भाग बेपत्ता झाले आहेत. या जहाजावरील कम्प्युटर यंत्रणेतील काही भाग हरवल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यासाठी तपास सुरु केला असून यासाठी विशेष तपास पथक देखील तयार केले आहे.

गायब झालेले सुट्टे भाग हे युद्धनौकेच्या यंत्रणांचा भाग नसल्यामुळे फार गंभीर गोष्ट नसली तरीही त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र यामुळे जहाजाच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे देखील सांगितले आहे. या तपासावर स्वतः पोलीस आयुक्त नजर ठेवून आहेत. अत्यंत सुरक्षित अशा विभागातून चोरी झाल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फार गांभीर्याने याचा तपास करत आहेत. त्याचबरोबर हि गोष्ट नौदलाच्या कक्षेत येत असल्याने सरंक्षण मंत्रालयाने यावर कोणतेही भाष्य दिलेले नाही.

एसआयटीची स्थापना

या चोरीप्रकरणी कोची पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून स्वतः पोलीस आयुक्त विजय साखरे यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे लवकरच या चोरीचा तपास लागेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

visit : Policenama.com 

Loading...
You might also like