कॉम्प्युटर इंजिनीअर कडून वाहतूक पोलिसांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

दुचाकीवरु ट्रिपल शिट जाणऱ्या कॉम्प्युटर इंजिनीअरनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना धक्काबुकी करत शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी (दि.२९) सकाळी दहाच्या सुमारास कोंढवा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडली. आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची रवानगी येरवडा कारगृहामध्ये केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’115dda66-c493-11e8-833b-27d89adc447c’]
अॅनावर इरफान मंडल (वय-२६), राफिऊर इरफान मंडल (वय-२१), रुपम जियाऊल मंडल (वय-२१), आएशा अॅनावर मंडल (वय-२३ चौघे रा. डिस्ट्रीक्ट सोसायटी, येवलेवाडी, पुणे, मुळ रा. वेस्ट बेंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या कॉम्प्युटर इंजिनीअरची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अलका राजेंद्र कांबळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस हवालदार अलका कांबळे, प्रशांत पिलनकर, सहायक पोलीस फौजदार जाधव, सोनवणे हे कोंढवा वाहतूक शाखेच्या कार्य़ालयासमोर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी पल्सर (एमएच ०४ जीएस ९६४०) गाडीवरु ट्रिपल शिट जात होते.

शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ : नरेंद्र मोदी 

त्यावेळी फौजदार अलका कांबळे यांनी या तिघांना आडवून गाडीची कागदपत्रे मागितली. तसेच गाडी चालवण्याच परवाना मागितला. आरोपींनी गाडीची कागदपत्रं न देता पोलिसांवर आरेरावी करण्यास सुरुवात केली. तुम्हाला कागदपत्रे आणि वाहतूक परवाना मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगत पोलिसांकडे ओळखपत्राची मागणी केली. तसेच मोबाईलमध्ये शुटींग करुन ते सोशल मिडीवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलिसांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29514b10-c493-11e8-be3c-e501d3a62091′]

दरम्यान, आरोपींनी आएशा मंडल हीला बोलावून घेतले. आएशा मंडल हिने पोलिसांबरोबर वाद घालून फिर्यादी यांना धक्काबुक्की करुन ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a8fa8b4-c493-11e8-bd9d-6dda2bbe248d’]

आरोपींना अटक करुन कोंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेले चौघेजण कॉम्प्युटर इंजिनीअर असून ते कॅम्प परिसरात स्मार्टस बीपीओ कॉल सेंटर चालवतात. या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजुर न करता त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

जाहिरात