जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जलतरण तलावात पोहण्यासाठी गेल्यानंतर तळाशी असलेल्या फरशीवर डोके आपटून जखमी झालेल्या संगणक अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी येथे समोर आली आहे. त्याच्यावर गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरु होते.

शाम नितीशकुमार कालरिया (वय. २२ वर्षे, वडगाव शेरी, मुळ रा. अहमदाबाद) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.

शाम कालरिया हा काही महिन्यांपुर्वी पुण्यातील एका बँकेत अभियंता म्हणून रुजू झाला होता. तो वडगाव शेरी येथे हर्मेस हेरिटेज या सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्यावर घेऊन मित्रांसोबत राहात होता. दरम्यान सोसायटीच्या आवारात असलेल्या एका जलतरण तलावात तो आणि त्याचे मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याने तलावात सूर मारला. परंतु पाण्याची पातळी कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. तेव्हा त्याचे डोके तळावर आदळले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर मागील १० दिवसांपासून उपचार सुरु होते. रविवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दिली.

Loading...
You might also like