पानसरे हत्येचा तपास SIT कडून काढून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास एआयटीकडून काढून घेण्याची हीच ती वेळ आहे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी सोमवारी (दि.14) मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर तसा रितसर अर्ज दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, आशाप्रकारे भर कोर्टात मागणी करून याचिकाकार्त्यांच्या वकिलांनी आणि कुटुंबीयांनी स्वत:च्याच अडचणी वाढवून घेतल्या आहेत. याची जाणीवही खंडपीठाने करून दिली.

कामात थोडीतरी प्रगती दाखवा – हायकोर्ट
पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टाने वारंवार आपली नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दुसऱ्या यंत्रणांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, तुमच्या कामात निदान थोडीतरी प्रगती दाखवा अशा शब्दात हायकोर्टाने या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना समज दिली आहे. पानसरे हत्या प्रकरणानंतर कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मागील दीड महिन्यात या प्रकरणात काम करता आले नाही. कारण या टीमला देखील बचावकार्य़ाच काम करावं लागले होते. मात्र तरीही दाभोळकर आणि कुलबुर्गी प्रकरणातील आरोपीचा ताबा मिळवून त्यांच्याकडून पानसरे हत्याकांडामागील सुत्रधारांची काही माहिती मिळतेय का ? याचा तपास सुरु असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले.

CBI ने मागितली मुदत
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआने आणखी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीपात्रातून शोधून काढण्यासाठी सीबीआयने हायकोर्टाकडे दोन आठवण्यांची मुदत हवी असल्याची माहिती कोर्टाला दिली. मात्र, या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची वाढीव मुदत संपण्यापूर्वी शोधकार्य संपवा, अशी आठवण हायकोर्टाने सीबीआयला करुन दिली.