Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसबाबत उडाली एक अफवा, ‘इथं’ कंडोम खरेदीसाठी गर्दीच-गर्दी

सिंगापूर : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1500 हून अधिक लोक मरण पावले आहेत. याची आता इतकी दहशत पसरली आहे कि लोक कशाचाही स्पर्श करण्यास संकोच करतात. चीननंतर कोरोना व्हायरसने सिंगापूरमध्ये तळ ठोकला आहे. येथील सरकारने कोरोनाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
corona condom
सिंगापूरमधील कोरोनाव्हायरससंदर्भात ऑरेंज अलर्टचा मुद्दा आल्यानंतर इथल्या बाजारात मास्क घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती मात्र मास्क संपल्यानंतर या दरम्यान अफवा पसरली की कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कंडोम प्रभावी आहेत, म्हणून लोकांनी कंडोम खरेदी करण्यास सुरवात केली. आता परिस्थिती अशी आहे की सिंगापूरच्या वैद्यकीय दुकानात कंडोम संपले आहेत. सोशल मीडियावर, लोक कंडोम हा कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग सांगत आहेत. लिफ्टचे बटण दाबायचे असो किंवा इमारतीचे दरवाजे उघडायचे असो लोक हातात कंडोम घालून ते उघडत आहेत. सिंगापूरच्या मीडिया रिपोर्टनुसार सिंगापूरमधील कोरोना व्हायरसची भीती आणखीनच वाढली जेव्हा पंतप्रधान ली हिसेन यांनी कोरोनाबद्दल सावध राहण्याचे आवाहन करत देशाला 9 मिनिटांचा संदेश दिला.

कोरोनाबद्दल संपूर्ण सिंगापूरमध्ये अशी भीती पसरली होती की वैद्यकीय दुकानांवर मोठी गर्दी होती आणि लोकांनी मोठ्या संख्येने सॅनिटायझर्स, मास्क खरेदी करून त्यांच्या घरी नेले. त्यानंतर सॅनिटायझर, मास्क नसल्यामुळे लोकांनी कंडोम खरेदी करण्यास सुरवात केली आणि बरेच मेडिकल स्टोअर पाहता पाहता रिकामे झाले. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे, चीननंतर सिंगापूरमध्ये लोकांना सर्वात जास्त संक्रमण झाले आहे. आतापर्यंत 58 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.

You might also like