Condom Stuck in Woman’s Lung : टीबीने ग्रस्त असल्याच्या शंकेने महिला पोहचली डॉक्टरकडे, परंतु सत्य ऐकून बसला धक्का

नवी दिल्ली : टीबी (Tuberculosis) एक संसर्गजन्य रोग आहे, ज्याचे जंतू सामान्यपणे फुफ्फुसावर हल्ला करतात, परंतु हा संसर्ग शरीराच्या अन्य भाग जसे की, मेंदू आणि पाठीच्या कण्याला सुद्धा प्रभावित करतो. बहुतांश प्रकरणे अँटिबायोटिक औषधाने बरी होतात, परंतु या वेदनादायी आजाराने अनेक लोक आपला जीव सुद्धा गमावतात. या संसर्गाची लक्षणे आणि गांभीर्य माहित असलेल्या एका महिलेला सतत खोकला, ताप, कफसारखी समस्या आणि सलग 6 महिन्यापर्यंत त्रास झाल्याने तिला शंका आली की हा टीबी तर नाही ना. जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा समजले की, तिच्या फुफ्फुसात कंडोम अडकला आहे, जो मुख मैथुन करताना नकळत गिळला गेला होता.

एक 27 वर्षीय शालेय शिक्षिकेवर उपचार अ‍ॅटिबायोटिक्स आणि अँटी-ट्यूबरक्लोसिसद्वोर सुरू होता, परंतु त्याचा महिलेवर प्रभाव पडत नव्हता आणि तिची समस्या जशीच्या तशी होती. अखेर महिला पुन्हा हॉस्पीटलमध्ये गेली, तेव्हा सत्य समजात तिला धक्काच बसला. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केस रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, महिलेच्या कफाची चाचणी टीबीसाठी करण्यात आली होती, परंतु ती निगेटिव्ह आली. डॉक्टरांनी जेव्हा तिच्या छातीचा एक्स-रे काढला तेव्हा तिच्या  फुफ्फुसाच्या उजव्या भागात सूज दिसून आली.

टीमने ऑपरेशन करून आतून एक रहस्यमय पातळ रबरी बॅग काढली, परंतु या प्रक्रियेदरम्यान तिचा बहुतांश भाग नष्ट झाला होता. मात्र, तो एक कंडोम असल्याचे दिसून आले. सत्य समोर आल्यानंतर महिला आणि तिच्या पतीने मान्य केले की, त्यांनी fellatio अ‍ॅक्ट केला होता. सोबत त्यांनी सांगितले की, या अ‍ॅक्टच्या दरम्यान कंडोम लूझ झाला होता आणि त्यावेळी महिलेला शिंक किंवा खोकल्यासारखी समस्या सुद्धा झाली. कदाचित हे सांगण्यास तिला लाज वाट होती की, नकळत तिने कंडोम गिळला होता.

महिलेची टीबीची शंका दूर करत अखेर डॉक्टरांनी सत्य शोधून काढले. याशिवाय डॉक्टरांनी महिलेच्या फुफ्फुसात अडकलेले उर्वरित छोटे तुकडे काढण्यासाठी आणखी एक ब्रोन्कोस्कोपी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.