जाणून घ्या भारतात लोक का कमी वापरतात कंडोम? समोर आलेल्या रिपोर्टमध्ये आश्चर्यकारक खुलासे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारता (India) ची निम्मी लोकसंख्या 24 वर्षापेक्षा कमी वयाची आहे तर यामध्ये 65 टक्के लोक 35 वर्ष वयाचे आहेत. या तरूण देशाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी तरूणांचे कल्याण महत्वाचे ठरते. अशावेळी प्रजनन आरोग्य एक महत्वाचा कारक आहे. अलिकडेच भारतात पहिल्यांदा ’कंडोमोलॉजी’ जारी करण्यात आली आहे. हा रिपोर्ट ग्राहक मानसशास्त्र आणि कंडोमबाबत दृष्टीकोणाचे विश्लेषण करतो. हा रिपोर्ट कंडोम अलायन्स, बाजारातील कंपन्या आणि अनेक गटांद्वारे तयार करण्यात आला आहे.

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

80 टक्के पुरुषांनी यावेळी केला नाही वापर
रिपोर्टचा उद्देश भारता(India )त तरूणांच्या कल्याणात सुधारणा आणि कंडोम वापराबाबत चुकीचे समज दूर करणे आहे. रिपोर्ट सांगतो की, कशाप्रकारे अनियोजित गर्भधारणेची संख्या, असुरक्षित गर्भपात आणि एसटीआयच्या संख्येत वाढ तरूणांसाठी सतत विकासातील बाधा ठरत आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण 4 (एनएफएचएस 4) च्या आकड्यांचा संदभ देत, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 20 ते 24 वर्ष वयाच्या जवळपास 80 टक्के पुरुषांनी आपल्या अंतिम लैंगिक जोडीदारासोबत गर्भनिरोधकाचा वापर केला नाही. जे प्रजनन आणि लैंगिक आरोग्यात एक स्पष्ट संकट आहे.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,169 नवीन रुग्ण, 29,270 जणांना डिस्चार्ज

केवळ 5.6 टक्के लोकच वापरतात कंडोम
रिपोर्टनुसार, भारता(India )त कंडोमचा वापर खुपच कमी आहे. भारतात केवळ 5.6 टक्के लोकच कंडोम वापरतात. रिपोर्ट सांगतो की, सुरक्षित सेक्स आणि गर्भ निरोधकांच्या वापरात सामाजिक स्थिती आणि सामाजिक निर्णय अजूनही अडथळे आहेत, ज्यामधून भारतातील तरूण अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीत. रिपोर्टनुसार, केवळ 7 टक्के महिला आणि 27 टक्के पुरूषांनी विवाह पूर्वीच्या लैंगिक संबंधादरम्यान कधीतरी कंडोमचा वापर केला, तर केवळ 3 टक्के महिला आणि 13 टक्के पुरुषांनी, नेहमी कंडोमचा वापर केला.

सरकारी प्रयत्नानंतर सुद्धा वापरात 2 टक्केच वाढ
हा डेटा 2014-15 मध्ये करण्यात आलेल्या एनएफएचएस-4 अभ्यासातून मिळवला होता. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गर्भ निरोधकांबाबत जागृतता पसरवण्यासाठी सरकारच्या नेतृत्वाखालील विविध अभियानानंतर सुद्धा, भारतातील कंडोम बाजारात मागील काही वर्षात केवळ 2 टक्केची चक्रवाढ वार्षिक वाढ दिसून आली. जागतिक डेटा भारतीय तरूण आणि पश्चिमात्य तरूणांमधील सेक्स आणि गर्भ निरोधकांसंबंधी सांस्कृतिक आणि सामाजिक तफावत दर्शवतो. भारत जगभरात एचआईव्ही प्रकरणात जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

कमी वापराचे हे आहे कारण
भारता(India )त गर्भ निरोधकाच्या कमी वापराबाबत रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कंडोमची आवश्यकता, त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत आणि तो कसा खरेदी करायचा, यापाठीमागील प्रमुख कारण लोकांचा संकोच आहे. कंडोम अलायन्सच्या सदस्य आणि भारताच्या प्रमुख डिजिटल लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि माहिती अधिकार मंच लव्ह मॅटर्सच्या संस्थापक विथिका यादव म्हणतात, आपल्या देशातील सध्याचे लोकसंख्याशास्त्र गर्भनिरोधकाच्या बाबतीत खुले, प्रामाणिक आणि आकर्षक संप्रेषणाची मागणी करते.

READ ALSO THIS :

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स

Pune : महापालिका प्रशासनाचा ‘साहित्य’ खरेदीला चाप ! जागा दाखवा आणि साहित्य खरेदीचा प्रस्ताव पाठवा; उधळपट्टीला चाप लावण्यासाठी सर्व खरेदी ‘वित्तीय समिती’च्या अधिपत्याखाली

LIC च्या या खास पॉलिसीमध्ये फक्त 28 रूपयांमध्ये मिळेल 2 लाखाचा फायदा, जाणून घ्या

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 276 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, लसीकरणाचा 5 लाखांचा टप्पा पार