‘लॉकडाऊन’नंतर लोकसंख्या बनू नये संकट, घरोघरी वाटले जातायेत ‘कंडोम’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – देशभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे मृत्यूचा धोका दिसत आहे आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्थेला खाली आली आहे. लॉकडाऊननंतर आता लोकसंख्या मोठी समस्या होऊ नये, म्हणून काँडमचे पॅकेट मोफत वाटले जात आहेत. यूपीच्या बलियामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या बलिया मध्ये जिल्हा प्रशासनाने घरा-घरात काँडम, माला-डी आणि कुटुंब नियोजनाच्या किटस वाटण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे आरोग्य विभागाची टीम घरोघरी जाऊन किट वाटत आहे. लॉकडाऊननंतर वाढती लोकसंख्या ही सरकारसाठी आणखी एक समस्या बनू नये, यासाठीच ही मोहीम राबवली जात आहे.

घरोघरी जाऊन काँडमचे पॅकेट वाटणाऱ्या आशांचे म्हणणे आहे की, शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये लोकांना कुटुंब नियोजनासाठी जागरूक करत आहेत.

या संदर्भात बलियाचे असिस्टंट सीएमओ डॉ. वीरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे घरात कैद झालेल्या पती-पत्नीसाठी कुटुंब नियोजन हे करमणुकीचे साधन बनू नये, यामुळे सरकारलाही चिंता वाटत आहे. लॉकडाऊन मध्ये लोकसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक घरात कुटुंब नियोजन किट वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.