तिहेरी हत्याकांड प्रकरणात ‘कंडोम’चा सिरीयल नंबर बनला मुख्य ‘पुरावा’ !

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – सुतावरून स्वर्ग गाठला जातो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय पोलिसांच्या तपासात नेहमी येत असतो. पोलीस एका छोट्या पुराव्यावरून देखील आरोपीचा माग काढत असतात. दिल्लीतील एका खुनाच्या घटनेच्या तपासप्रकरणात पोलिसांनी देखील अशाच प्रकारे एका कंडोमच्या सिरियल नंबरवरून गुन्हेगारांचा माग काढत अटक केली. नवी दिल्लीतील वसंत विहारमध्ये एका वृद्ध दाम्पत्याचा क्रूरपणे खून करून घरातील मुद्देमाल लांबवला होता. मात्र पोलिसांनी या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पाच वर्षांपूर्वी आपल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पाच वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर निर्दोष सुटलेल्या या आरोपीच्या विरोधात पोलीस मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करत आहे. २२ जून रोजी दिल्लीतील वसंत विहारमध्ये हे तिहेरी हत्याकांड घडले होते. या हत्येनंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नर्सच्या उशाला कंडोमचे पाकीट ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मनोज भट्ट आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना त्याच्या फ्लॅटमधील कचऱ्यात चाकू, रक्ताने माखलेले कपडे आणि दोन कंडोमची पाकिटे मिळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरात मिळून आलेलं कंडोम आणि त्याच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेल्या कंडोमचे सिरीयल नंबर जुळत असल्याने पोलिसांना एक सबळ पुरावा हाती लागला.

दरम्यान, दोन्ही आरोपींनी गुन्हा करताना अतिशय सावधगिरी बाळगली होती. गुन्ह्यावेळी आपल्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना कळू नये म्हणून त्यांनी मोबाईल घरीच ठेवला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला सुरुवातीला अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांना आपले मोबाईल लोकेशन तपासायला सांगितले होते.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like